हिरोईन बनायचंच नव्हतं - नर्गिस, never wanted to become heroine - nargis fakhri

हिरोईन बनायचंच नव्हतं - नर्गिस

हिरोईन बनायचंच नव्हतं - नर्गिस
www.24taas.com, नवी दिल्ली
‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाकरीचा चेहरा आता प्रेक्षकांच्या ओळखीचा झालाय. याच सिनेमानं तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिलीय. पण, नर्गिसच्या मते तिला ही ओळख नकोच होती... तिला कधी हिरोईन व्हायचंच नव्हतं.

नर्गिसच्या म्हणण्यानुसार तिला कधीही अभिनेत्री बनायचं नव्हतं. पण रॉकस्टारची पटकथाच एव्हढी आकर्षक होती की त्यापासून स्वत:ला दूर ठेवणं केवळ अशक्य होतं आणि त्यामुळेच तिनं या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. आपण हा सिनेमा असल्याचं लगोलग तिनं संबंधितांना कळवलंही. नर्गिस नुकतीच एचसीएलची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनलीय. बुधवारी एचसीएल कंपनीच्या अल्ट्रास्लिम अल्ट्राबूकच्या लॉन्चिंगच्या वेळी ती उपस्थित होती. त्यावेळी तिनं ही गोष्ट उपस्थितांसमोर व्यक्त केलीय. ‘रॉकस्टार’ सिनेमात रणबीरच्या प्रेयसीच्या भूमिकेत नर्गिस चपखल बसलीय.

नर्गिस म्हणते, देवानं माझ्या आजवरच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी मांडल्यात तसंच मला अनेक चांगल्या संधीही मिळाल्यात. रोमांचक गोष्टींना मला आजवर कधीही नकार देता आलेला नाही आणि मी माझ्या पहिल्या-वहिल्या सिनेमाला नकार देऊ शकले नाही, त्यामागचंही हेच कारण होतं.

First Published: Thursday, September 20, 2012, 10:28


comments powered by Disqus