प्रजासत्ताक दिनी राजधानीत २० हजार जवान तैनात!, new delhi is ready for republic day

प्रजासत्ताक दिनी राजधानीत २० हजार जवान तैनात!

प्रजासत्ताक दिनी राजधानीत २० हजार जवान तैनात!
www.24taas.com, नवी दिल्ली

शनिवारी प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली सज्ज झालीय. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.

प्रजास्ताक दिनी राजपथावरील मुख्य समारोह स्थळापासून व्हीव्हीआयपी गॅलरी आणि परेड रुटसह आसपासच्या परिसरात २० हजार जवान तैनात असतील. जमिनीपासून आकाशापर्यंत सुरक्षेची काळजी घेण्यात आलीय. वायुसेनेचे हेलिकॉप्टर्स आकाशात पाहारा देतील. परेड संपेपर्यंत दिल्लीच्या हवाईक्षेत्रात उड्डाणाला प्रतिबंध करण्यात आलाय. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन, बस टर्मिनस आणि एअरपोर्टची सुरक्षाही वाढवण्यात आलीय.

कसाबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर उद्या दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता सुरक्षा एजन्सीजकडून व्यक्त करण्यात आलीय. ‘यूएव्ही’ म्हणजे ‘अनमैंड एरिअल व्हेईकल’च्या सहाय्याने दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी माहितीही सुरक्षा एजन्सीजकडून देण्यात आलीय.

First Published: Friday, January 25, 2013, 15:45


comments powered by Disqus