Last Updated: Monday, June 17, 2013, 18:35
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं मंत्रिमंडळात फेरबदल केलाय. नवीन आठ चेह-यांना संधी देऊन मनमोहन सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय. आज आठ मंत्र्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.
ऑस्कर फर्नांडीस यांना रस्ते आणि महामार्ग खातं देण्यात आलंय. तर गिरीजा व्यास यांना शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आंध्र प्रदेशातल्या के एस यांना वस्त्रोद्योग खातं देण्यात आलंय. सीसराम ओला यांच्याकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
तर राज्यमंत्र्यांमध्ये नंदुरबारचे खासदार माणिकराव गावित, पंजाबच्या संतोष चौधरी, जे डी सालेम आणि इ एन एस नचिअप्पन यांची वर्णी लागलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 18:35