राणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक Nitesh Rane areested by Goa Police

राणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक

राणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नितेश यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सिंधुदुर्गतून गोव्यात जात होते. त्यांना रस्त्यात कलंगूट टोलनाक्यावर टोलसाठी अडवले. मात्र आपण नारायण राणेंचे पुत्र आहोत अशी ओळख नितेश यांनी दिली. मात्र गाडी सरकारी नसल्यामुळं त्यांना टोल कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या नितेशच्या बॉडी गार्ड्सनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसंच टोल नाक्याचीही तोडफोड केली.

यात तीन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या ९ कार्यकर्त्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आलीय. नितेश राणे यांना आपल्या कार्यकर्त्यांसह आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 20:09


comments powered by Disqus