गडकरी सांगा अध्यक्षपद की उद्योग - गुरुमुर्ती ,Nitin Gadkari Speak presidency or industry - Gurumurti

गडकरी सांगा अध्यक्षपद की उद्योग - गुरुमुर्ती

गडकरी सांगा अध्यक्षपद की उद्योग - गुरुमुर्ती
www.24taas.com,नवी दिल्ली

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अर्थतज्ञ एस. गुरुमुर्ती यांच्या नव्या मतप्रदर्शनामुळं भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे गडकरी काय निर्णय घेतात की त्यांच्यावरील शाब्दीक हल्ला परतावून लावणार, याकडे लक्ष लागले आहे.

गडकरी यांनी पक्षाची अडचण आणि बदनामी टाळण्यासाठी आपले अध्यक्षपद किंवा उद्योग यापैकी एकाची निवड करावी, असं गुरुमूर्ती यांनी म्हटलंय.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखानं उद्योगात राहू नये, असं आपलं मत असल्याचं गुरुमूर्ती यांनी नमूद केलंय. गडकरी यांच्या कथित गैरव्यवहरांचे ऑडिट सद्भावनेपोटी केले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

गडकरी पक्षाध्यक्षपदी राहतात की नाही याची मला फारशी फिकीर नाही, असं एस. गुरुमूर्ती यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, गुरुमूर्ती यांनी गेल्याच आठवड्यात गडकरी यांना कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या क्लीन चिट दिली होती.

First Published: Wednesday, November 14, 2012, 10:53


comments powered by Disqus