अफझल गुरूला इतक्यात फाशी नाहीच no death punishment for Afzal yet

अफझल गुरूला इतक्यात फाशी नाहीच

अफझल गुरूला इतक्यात फाशी नाहीच
www.24taas.com, नवी दिल्ली

कसाबला फाशी दिल्यावर आता अफझल गुरूला कधी फाशी होणार असा प्रश्न देशभरातून विचारला जातोय. मात्र अफझल गुरूला कधी फाशी दिली जाईल, याबद्दल अजून कुठलाही निर्णय घेतला गेला नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दिली आहे.

अफझल गुरूच्या दया याचिकेबद्दल शिंदे म्हणाले, की त्यासंदर्भातली कुठलीही फाईल आम्हाला राष्ट्रपतींकडून अद्याप आलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री बनल्यानंतर माझ्याकडे केवळ कसाबची फाईल आली होती, असं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

26/11च्या मुंबईवरील हल्ल्यात वाचलेल्या कसाबला २१ नोव्हेंबर रोजी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला कधी फाशी दिली जाईल याची देशाला उत्सुकता आहे. मात्र ते इतक्यात तरी शक्यता नाही, असं दिसतंय.

First Published: Wednesday, December 5, 2012, 20:32


comments powered by Disqus