Last Updated: Monday, April 15, 2013, 09:53
www.24taas.com,नवी दिल्लीइनकम टॅक्स भरलाय! भरला असेल तर निवांत राहा. ज्यांनी टॅक्स भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या. नाही तर तुमची नावे प्रसिद्ध होणार आहेत. प्राप्तिकर खात्याने तसं पाऊल उचलले आहे. याआधी इनकम टॅक्स विभागाने ज्यांनी कर भरला नाही त्यांना नोटीस पाठविली होती. आता त्यापुढे जाऊन हे पाऊल उचलले आहे.
आता कर चुकव्यांची नावे फरार गुन्हेगारांप्रमाणे पत्त्यासह सार्वजनिक करण्याचा निर्णय प्राप्तिकर खात्याने घेतला आहे. दरम्यान, प्राप्तिकर खात्याची धाड पडल्यावर अनेकांची बोबडी वळते. या खात्याचा बडगा चुकवण्यासाठी अनेक जण गुपचूप कर भरण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र, समाजातील काही निगरगट्ट करदाते चक्क प्राप्तिकर खात्यालाही जुमानत नाहीत. त्यामुळे हे नवे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
जे कर बुडवत आहेत. त्यांनी माहिती नाव आणि पत्त्यासह समाजासमोर जाहीर करण्याचा निर्णय प्राप्तिकर खात्याने घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात संकेतस्थळावर आणि त्यानंतर वृत्तपत्रांत ही माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
देशात कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न कमवूनही काही जणांना कर चुकवण्याची सवय लागलेली आहे. याला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतची यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी लवकरच प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. सीबीआय, एनआयए किंवा पोलीस ज्याप्रमाणे फरारी गुन्हेगारांची यादी जाहीर करतात, त्याच धर्तीवर प्राप्तिकर विभाग ही मोहीम राबवणार आहे.
First Published: Monday, April 15, 2013, 09:53