Last Updated: Sunday, October 28, 2012, 11:27
www.24taas.com, नवी दिल्लीमंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला ठेंगा मिळण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात महाराष्ट्रातून शिवराज पाटील-चाकुरकर, विलास मुत्तेमवार, भास्करराव पाटील-खतगावकर, गुरूदास कामत यांची वर्णी लागेल, अशी शक्यता होती.
मात्र यापैकी कोणालाही आमंत्रण गेलेलं नसल्यामुळे महाराष्ट्राच्या तोंडाला पानंच पुसली जाणार आहेत. मिलिंद देवरा यांना बढती मिळणार आहे. ते राज्यमंत्रीच राहणार असले, तरी आता त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार असेल.
राष्ट्रवादीकडून मात्र अगाथा संगमांच्या जागी तारीक अन्वर मंत्रिमंडळात जाणार आहेत.
First Published: Sunday, October 28, 2012, 11:27