Last Updated: Saturday, February 22, 2014, 14:34
www.24taas.com, झी मीडिया, पासीघाटजगात कुणाकडेही भारताकडून अरूणाचल प्रदेश हिसकावण्याची ताकद नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल प्रदेशच्या पासीघाटमध्ये भाजपच्या सभेत बोलतांना हा इशारा दिला आहे.
अरूणाचल प्रदेशचा प्रत्येक व्यक्ती भारताचं मनापासून संरक्षण करतो, तसेच चीनच्या लोकांच्या दबावात अरूणाचल प्रदेशचे लोक येत नाहीत.
विस्तार करण्याचं राजकारण जगात कुठेही आजच्या घडीला चालत नाही, म्हणून चीनने विस्तार करण्याच्या भानगडीत पडू नये, असा सल्लाही नरेंद्र मोदी यांनी चीनला दिला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 22, 2014, 14:33