'हुंड्याशिवाय शरीरसंबध ठेवणार नाही...', no sex without dowry

'हुंड्याशिवाय शरीरसंबध ठेवणार नाही...'

'हुंड्याशिवाय शरीरसंबध ठेवणार नाही...'
www.24taas.com,झी मीडिया, कोइम्बतुर

हुंडा दिला नाही म्हणून पत्नीचा छळ, मारहाण अथवा जाळणे अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या, ऐकल्या असतील. पण हुंडा दिल्याशिवाय शरीरसंबंध ठेवणार नाही अशी विचित्र धमकी एका माथेफिरु पतीने दिलीय.

तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूरमध्ये ही घटना घडलीय. एका पत्नी(प्रिया)ने लग्नाला एक वर्ष होऊनही पती(रमेश) संबध ठेवण्यास तयार नाही असा आरोप करून आपल्याच पतीला अटक करायला लावली. खरंतर त्याची मागणी अशी होती की पत्नीने हुंडा द्यावा त्यानंतरच तो तिच्याशी शरीरसंबध ठेवेल. गेल्या वर्षी मार्चमध्ये रमेश आणि प्रियाचे लग्न झाले होते. पाच लाख रुपये रोख आणि दागिने प्रियाने द्यावेत अशी रमेशची मागणी होती आणि पुढे त्याने असंही सांगितल की जोपर्य़ंत माझी मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी प्रियाशी संबध ठेवणार नाही.

गेले सोळा महिने पती (रमेश) आपली पत्नी (प्रिया) हिचा अशाप्रकारे मानसिक छळ करतोय. या छळाला कंटाळून तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतलीय. या आरोपाच्या आधारावर पोलिसांनी रमेशला अटक केलीय. तसेच रमेशच्या आईवडिलांचा शोध चालू आहे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, July 20, 2013, 18:19


comments powered by Disqus