Last Updated: Wednesday, August 28, 2013, 14:44
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ प्रशासकीय अधिकारी दुर्गा शक्ति नागपाल प्रकरणाला आता आणखी एक नवं वळण मिळालंय. दुर्गा शक्ती नागपाल यांना क्लिन चीट देणारे गौतम नगरचे जिल्हाधिकारी (डीएम) रविकांत सिंह यांना पदावरून दूर केलं गेलंय.
रविकांत यांच्या जागी हिरालाल गुप्ता यांना नोएडाच्या डीएम पदावर नियुक्त करण्यात आलंय. रविकांत यांना मात्र पदावरून दूर केलं असलं तरी दुसरीकडे कुठेही पोस्टींग मात्र देण्यात आली नाही. त्यांना लखनऊला बोलावून घेण्यात आलंय. दुर्गा शक्ती यांना क्लीन चीट मिळाल्यानंतरच रविकांत यांनाही रस्त्यातून दूर केलं जाणार, याची खात्री अनेकांना होती. अखिलेश सरकारचे मंत्री आजम खाँ आणि खासदार नरेश अग्रवाल यांनी रविकांत यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती.
ग्रेटर नोएडाच्या एसडीएम दुर्गा शक्ती नागपाल यांना मशिदीची भिंत पाडण्याच्या आरोपामध्ये डीएम रविकांत सिंह यांनी क्लिन चीट दिली होती. दुर्गा शक्ती यांच्या निलंबनामागे वाळू माफियांचा हात असण्याचा आरोप होतोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 14:32