मी पळपुटा नाही, जो अमृतासोबतचे संबंध लपवेनः दिग्विजय सिंह, Not coward like Narendra Modi: Digvijay S

मी पळपुटा नाही, जो अमृतासोबतचे संबंध लपवेनः दिग्विजय सिंह

मी पळपुटा नाही, जो अमृतासोबतचे संबंध लपवेनः दिग्विजय सिंह

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टीव्ही पत्रकार अमृता रायसोबत आपले संबंध गुरूवारी मीडिया समोर मान्य केले, मी पळपुटा नाही की जो अमृतासोबतचे संबंध लपवेन, असेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोदींना टोला लगावला आहे.

काँग्रेसचे ६७ वर्षीय नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी ट्विटरवर महिला पत्रकार अमृता राय हिच्या संबंध असल्याचे मान्य केले तसेच ते लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. यापूर्वी सोशल मीडियावर या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली होती.

दिग्विजय यांच्या कबुलीनंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जगासमोर आले. यापूर्वी त्यांच्यातील संबंधातील काही फोटो सोशल मीडियावर फिर होते. त्यामुळे या दोघांना आपले प्रेम जाहीर करणे भाग पडले. एका दिवसापूर्वी दिग्विजय आपल्या अशा काही संबंधावर नकार देत होते.

अमृता राय या ४२ वर्षीय टीव्ही रिपोटरशी संबंध असल्याचे ६७ वर्षीय दिग्विजय यांनी एक दिवसांपूर्वी मान्य केले नव्हते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दिग्गीराजांनी ट्विटरवर सांगितले हे स्वीकारण्यास मला काहीच हरकत नाही. त्यांनी सांगितले की, पतीच्या सहमतीने घटस्फोटाचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. घटस्फोट झाल्यावर आम्ही या संबंधाना औपचारीक रूप देणार आहोत. सिंह यांच्या पत्नीचे गेल्यावर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 17:25


comments powered by Disqus