डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला, Not unduly worried, rupee to stabilise in 3-4 days: Fin Min

डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला

डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली

डॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.

रूपयाचा भाव सावरत तो पुन्हा ५७.४७ वर गेला. त्याचा चढउताराचा खेळ दिवसभर चालूच राहिला. मात्र सोमवारी सकाळी हा भाव ५८.१६ पर्यंत घसरला. डॉलरच्या या किंमतीने फक्त रुपयावरच परिणाम केला नाही तर बाकी चलनावरही त्याचा परिणाम झालाय, असं वित्त सचिव अरविंद मायाराम यांनी म्हटलं आहे.


सलग पाच आठवड्यापासून रुपयामध्ये ही घसरण होत आहे. रुपयाच्या घसरणीचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 16:56


comments powered by Disqus