खुशखबर, आता मिळणार 90 टक्के होमलोन

खुशखबर, आता मिळणार 90 टक्के होमलोन

खुशखबर, आता मिळणार 90 टक्के होमलोन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जर तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल, तर ही तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण तुम्हाला आता घराच्या 90 टक्के रकमे एवढं लोन मिळणार आहे.

नॅशनल हाऊसिंग बँकने या दिशेने पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे.

20 लाख रूपयांपेक्षा अधिक किंमतीचं घर असणाऱ्यांसाठी ही योजना असल्याचं सांगण्यात येत आहे. द इकोनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे. बँक सध्या प्रॉपर्टीच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात.

नॅशनल हाऊसिंग बँक, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवते, त्यांना मार्गदर्शन करते.

नॅशनल हाऊसिंग बँकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आरव्ही वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना अशा ग्राहकांना लागू होईल, जे ग्राहक प्रापर्टी गहाण ठेवण्याची हमी देतात.

आरबीआयकडे रजिस्टर्ड असलेल्या कोणत्याही कंपनीकडे प्रापर्टी गहाण असल्याचं डिफॉल्ट होण्याचा धोका कितीतरी कमी होतो.

नव्या सोयीनुसार एक कोटी रूपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना 90 लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 10:08


comments powered by Disqus