लक्ष द्या: पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द Now a PAN card become Easily, the new process put on

लक्ष द्या: पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द

<B> <font color=#ff0000>लक्ष द्या:</font> पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द</b>
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नवं पॅनकार्ड बनविण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारीपासून लागू होणारे नवे नियम आता लागू होणार नाहीयेत. ही प्रक्रिया सरकारनं तात्पुरती रद्द केलीय. त्यामुळं आता पूर्वीसारखेच पॅनकार्ड लवकर बनवता येणार आहे.

अर्थ मंत्रालयानं गुरूवारी सांगितलं की याबाबत १६ जानेवारीला पॅनकार्ड संबंधीच्या नव्या नियमांबाबत आदेश दिले होते, ते तात्पुरते मागे घेण्यात येत आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत जुनीच प्रक्रिया सुरू राहणार आहे.

तुमचं परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी ओळख द्यावी लागणार होती. येत्या ३ फेब्रुवारीपासून पॅन मिळण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात येणार होते. या नियमांमध्ये जन्मतारीख आणि पत्त्याच्या पुराव्याखेरीज आयडेंटिटी प्रूफ (ओळख) ही द्यावी लागणार होती. मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स यासारखे पुरावे यासाठी ग्राह्य धरले गेले असते. प्राप्तीकर खात्याच्या परमनंट अकाऊंट नंबरसाईठी सरकारनं ज्यावरून ओळख पटेल असा दस्तावेज (आयडेंटिटी प्रूफ) देणं सक्तीचं केल्यानं आणि तपासून पाहाण्यासाठी मूळ कागदपत्रंही सादर करणे सक्तीचे केल्याने येत्या महिन्यापासून नागरिकांना `पॅनकार्ड` काढण्यासाठी पूर्वीहून थोडे जास्त कष्ट घ्यावे लागणार होते.

पण आता हे नवे नियम रद्द केल्यानं, पुन्हा जुन्या पद्धतीनंच पॅन कार्ड मिळणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 11:33


comments powered by Disqus