Last Updated: Sunday, September 2, 2012, 12:37
www.24taas.com, नवी दिल्लीकोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसाकांडप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्य़ावर अडून बसलेल्या भाजपनं आता एक पाऊल मागं घेण्याची तयारी दर्शवली आहे.
पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणी मागे घेऊन वाटप केलेल्या खाणींचे परवाने रद्द करण्याची मागणी भाजपनं केली. तसंच खाण वाटप घोटाळ्याची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणीही भाजपनं लावून धरलीय. त्यामुळं काँग्रेस आणि भाजपमध्ये तोडगा निघाल्याची चर्चा आहे. त्यामुळं उद्यापासून संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याची शक्यता आहे.
भाजपनं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती तर काँग्रेसनं मनमोहन सिंग यांची पाठराखण करत भाजपची मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळं आठ दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प आहे. आता भाजपनं नरमाईची भूमिका घेतल्यामुळं उद्यापासून तरी संसदेचं कामकाम सुरळीत होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
First Published: Sunday, September 2, 2012, 12:37