फेसबुकवर मोदीसमर्थकांची `सेन`सेशनल सूचना! obscene pictures of Nandana Sen uploaded on FB

फेसबुकवर मोदीसमर्थकांची `सेन`सेशनल सूचना!

फेसबुकवर मोदीसमर्थकांची `सेन`सेशनल सूचना!
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

आमर्त्य सेन यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला केलेला विरोध मोदी समर्थकांना चांगलाच झोंबला आहे. आमर्त्य सेन यांच्यापेक्षा त्यांच्या मुलीचे अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह टिपण्णी करत फेसबुकवर मोदी समर्थकांना आपला राग व्यक्त केला आहे.

बीजेपी गुजरात नामक एका फेसबुक पेजवर यासंबंधी आक्षेपार्ह फोटो अपलोड केले गेले आहेत. यात आमर्त्य सेन यांनी अभिनेत्री कन्या नंदना सेन हिचे अर्धनग्न फोटो आहेत आणि त्याचसोबत सेन यांना इशारा दिला आहे. ‘अमर्त्य सेन साहेब, तुम्ही पहिले आपले घर आणि आपल्या मुलीला सांभाळा,तेच खूप आहे तुमच्यासाठी... देशाचा आणि मोदींचा निर्णय घेण्यासाठी भारताचे नागरीक आहेत. आम्हाला कोणत्याही वृध्दाची गरज नाही. मोदींना बोलण्यापेक्षा आपल्या मुलीला संभाळा... लाज वाटू द्या जरा.” अशा अर्थाचं वक्तव्य या फोटोसोबत केलं आहे.
अगोदर निर्देश केलेल्या बाबींसंबंधी बोलतांना नंदना सेन हिने ब्लाँक, टॅगो चार्ली आणि रंग-रसिया सारख्या बॉलीवूड सिनेमामध्ये काम केलेले आहे.२००८ मध्ये आलेल्या रंग-रसिया सिनेमातून ती जास्त चर्चेत आली होती.
अभिनेत्री नंदना सेन ही नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतरत्न पुरस्कार विजेते आमर्त्य सेन यांची कन्या आहे. तिने ब्लॉक, टँगो चार्ली तसंच रंग रसिया या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. या सिनेमातील तिचे हॉट सीन्स आणि रंग रसियामधील नग्न दृश्यांमुळे नंदनावर टीका झाली होती.

काही दिवसांपूर्वी, अमर्त्य सेन एका मुलाखतीमध्ये असे म्हणाले होते की, एक भारतीय या नात्याने आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधानांच्या रूपात पाहू इच्छित नाही. या विधानाबद्दल भाजपमधून सेन यांच्यावर खूप टीका झाली होती. भाजप नेते चंदन मित्रा यांनी तर ‘भाजपची सत्ता आल्यावर सेन यांचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा’, अशी सूचना केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 18:02


comments powered by Disqus