Last Updated: Saturday, December 15, 2012, 14:22
www.24taas.com, मुंबई तुमच्याकडे असणारे चेकबुक आता लवकरच बदलणार आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत त्या चेकचा वापर करता येणार आहे. त्यामुळे जुने चेक लवकरच बाद होणार हे मात्र नक्की बँक खातेदारांना जुन्या प्रणालीच्या चेकचा वापर पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआयने) सीएसटी चेक प्रणालीचा वापर एप्रिल 2013 पासून करण्याचे निर्देश बँकांना दिले.
31 डिसेंबरपासून सर्व चेक बंद करावा असे निर्देश आरबीआयने यापूर्वी दिले होते. या प्रणालीतील चेकमुळे फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे मत आरबीआयने व्यक्त केले होते.
याउलट, सीएसटी-2010 प्रणालीतील चेक सुरक्षित व गतीने निपटारा करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असून `अँट पार` चेक कोणत्याही शाखेत वटवता येतील, त्यामुळे सीएसटी-2010 चेकची प्रणाली स्वीकारण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
First Published: Saturday, December 15, 2012, 14:01