राहुल गांधींपुढे सरकार झुकलं, वटहुकुम मागे... , Ordinance is going to be cancelled

राहुल गांधींपुढे सरकार झुकलं, वटहुकूम मागे...

राहुल गांधींपुढे सरकार झुकलं, वटहुकूम मागे...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कलंकीत लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणारा वटहुकूम अखेर केंद्र सरकारनं मागे घेतलाय. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे पवार आणि सपाचा विरोध डावलून काँग्रेसनं सरकारला वटहुकूम मागे घेण्यास भागं पाडलं.

कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने वटहुकुम मागे घेतला. हा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतल्याचं जरी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी जाहीर केलं असलं, तरी शरद पवार आणि सपा या घटक पक्षांची माराजी यापूर्वीच समोर आली आहे. अशा प्रकारे निर्णय मागे घेऊन राहुल गांधींपुढे पंतप्रधानांसह सर्व सरकार झुकल्याचं दिसून आलं.

सरकार गांधी घराण्याच्या इशा-यावर चालत असल्याचं आजच्या प्रकरणावरून स्पष्ट झाल्याची टीका भाजपनं केलीय. यावरून आजपर्यंत युपीए सरकारमध्ये झालेले घोटाळेही गांधींच्याच इशा-यावरून होत असल्याचा आरोपही केलाय. तर जेडीयूनं मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 18:57


comments powered by Disqus