पद्मनाभ मंदिराच्या सुवर्ण साठ्याला गळती? padmanabha temple and gold leak

पद्मनाभ मंदिराच्या सुवर्ण साठ्याला गळती?

पद्मनाभ मंदिराच्या सुवर्ण साठ्याला गळती?
www.24taas.com, झी मीडिया

पद्मनाभ मंदिराच्या सुवर्ण साठ्याला गळती लागल्याची चर्चा आहे, कारण पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दालनांमध्ये तीन वर्षांपूर्वी सापडलेल्या अगणित संपत्तीतून काही सोन्याच्या वस्तूंची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

न्यायालय मित्र गोपाल सुब्रमण्यम् यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून याबाबतही धक्कादायक माहिती पुढे आलीय. मंदिर आणि संपत्तीच्या व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याचे नमूद करीत न्यायालय मित्राकडून या संपत्तीच्या वैज्ञानिक परीक्षणाची विनंती केलीय.

या मंदिराच्या व्यवस्थापनाचे सदस्य असणाऱ्या त्रावणकोरच्या राजघराण्याला मंदिराच्या दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे.

व्यवस्थापन सदस्यांनी मंदिराच्या तळघरातील `कल्लारा- बी` हे दालन उघडण्यास विरोध दर्शविला असला तरीही प्रत्यक्षात हे दालन आधीच उघडण्यात आल्याचे एक प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे असल्याचे अहवाल सांगतो. त्यामुळे शक्यतो माजी कॅग विनोद राय यांच्या नेतृत्वाखाली एक चमू स्थापन करून या मंदिरातील साठय़ाचे परीक्षण करण्यात यावे, असेही सुब्रमण्याम यांनी म्हटले आह़े.

अनेक दिवस केरळच्या राजधानीत वास्तव्य करून सुब्रमण्यम यांनी हा अहवाल तयार केला आह़े मंदिराच्या व्यवस्थापनात अनेक त्रुटी असून सोने चोरीच्या अनेक घटनाही घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तसेच मंदिराजवळ सोन्याचा मुलामा देणारे यंत्र हस्तगत झाल्याने दालनातील सोन्याच्या काही मूळ गोष्टी लंपास करून त्या ठिकाणी प्रतिकृती ठेवण्यात आल्याचाही संशय येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 20, 2014, 12:36


comments powered by Disqus