कसाबचा मृतदेह पाकने मागितलाच नाही- शिंदे , Pak not demand kasab body - shinde

कसाबचा मृतदेह पाकने मागितलाच नाही- शिंदे

कसाबचा मृतदेह पाकने मागितलाच नाही- शिंदे
www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे. कसाबची याचिका ५ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली होती, नोव्हेंबरला त्या फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी ७.३० मिनिटांनी त्याला फाशी देण्यात आली.

फाशी देऊन आम्ही २६ /११च्या मुंबई हल्ल्याच्या प्रकरणाची न्यायीक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कसाबला फाशी दिल्याचे आम्ही पाकिस्तानला कळविले आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या सरकारला एका पत्राद्वारे ही माहिती दिली. पाकिस्तानने पत्र स्वीकारण्यास नकार केला, त्यामुळे आम्ही ही माहिती फॅक्सद्वारे कळविल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कसाबच्या फाशीसंदर्भात जी काही कारवाई करायची होती, ती मी माझ्याकडे फाईल आल्यावर तत्काळ केली. पाकिस्तानला या संबंधी माहिती कळविण्यात आली असून त्यांनी कसाबचा मृतदेह मागितला नाही.

First Published: Wednesday, November 21, 2012, 10:51


comments powered by Disqus