पाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबारPak violates ceasefire as Manmohan returns after meeting Sharif

पाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार

पाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार
www.24taas.com, पीटीआय, जम्मू

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.

एकीकडे रविवारी न्यूयॉर्कमध्ये मनमोहन सिंह आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांची भेट झाली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या भेटीत सीमेपलीकडील दहशतवाद थांबविण्यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांना फटकारलं होतं. पंतप्रधान भारतात परतताच पाकिस्ताननं पुन्हा हा हल्ला केलाय.

काल झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख उत्तर दिलं.

ऑगस्ट महिन्यात पाक सैन्यानं भारतीय लष्करातील पाच जवानांची निघृण हत्या केल्यानंतर सीमारेषेवर अत्यंत तणावपूर्ण स्थिती असून सतत संघर्ष सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 13:13


comments powered by Disqus