२००५पूर्वीच्या नोटा परत घेऊन पाकिस्तानला चपराक, Pakistan back to his old notes into a trap set

२००५पूर्वीच्या नोटा परत घेऊन पाकिस्तानला चपराक

२००५पूर्वीच्या नोटा परत घेऊन पाकिस्तानला चपराक
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पाकिस्तानच्या नकली नोटा चलनात येण्याआधीच त्यांना बाद करण्याचा चंग भारतीय रिझर्व्ह बॅंक म्हणजेच आरबीआयने बांधला आहे. त्यासाठी २००५च्या आधीच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानने भारतात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी २००५ पर्यंतच्या नोटा छापण्याचा निर्णय केला. याची माहिती भारताला अर्थात आरबीआयला मिळाली. त्यामुळे पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घालण्यासाठी हे आरबीआयने पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानमध्ये २००५च्या आधी नोटांची बनावट प्रिंट झाली आहे. यामध्ये १००, ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. या नोटा भारतीय चलनातील नोटांची हुबेहुब कॉपी आहे. त्यामुळे भारतीय चलनातील बनावट ओळखण्यास कठिण होते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने भविष्यातील धोका लक्षात घेऊन पाकिस्तानी बनावट नोटा रोखण्यासाठी २००५पर्यंतच्या सर्वच नोटांवर बंदी घातली असून अशा नोटा परत मागविल्या आहेत.

त्यामुळे त्याआधीच्या नोटा बॅंकेत बदलून मिळणार आहेत. आरबीआयचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांनी २००५च्या आधीच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळ्या पैशालाही आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 15:57


comments powered by Disqus