Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:19
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली पाककडून भारतीय सीमेवर सुरु असलेल्या नापाक कारवायांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकनं दाऊदबाबतची खेळी खेळायला सुरूवात केलीय, अशी शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताला मोस्ट वॉ़टेंड असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात होता अशी खळबळजनक कबुली पाकिस्तानं दिलीय. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी हा गौप्यस्फोट केलाय. दाऊद आता अरब राष्ट्रांमध्ये असून ‘यूएई’मध्येच लपला असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय. मात्र, पाकचा हा कबुलीनामा भारताची दिशाभूल करण्यासाठी असल्याचा कयास संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
दाऊद पाकिस्तानात होता तर त्याची माहिती भारताला का देण्यात आली नाही? रेड कॉर्नर नोटीस बजावलेल्या दहशतवाद्याला पाकमध्ये थारा देणं हे आतंरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन नाही का? असे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 17:18