शरीफ यांना राष्ट्रगीतासाठी उभे राहावे लागले, Pakistan PM Nawaz Sharif arrives in Delhi for Modi`s sw

शरीफ यांना राष्ट्रगीतासाठी उभे राहावे लागले

शरीफ यांना राष्ट्रगीतासाठी उभे राहावे लागले

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच सर्वांबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उभे राहिले. भारताच्या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहावे लागू नये म्हणून त्या-त्या कार्यक्रमाच्या वेळी अनुपस्थित राहणे किंवा उशिरा येण्याचा मार्ग अवलंबणार्यान शरीफ यांना यावेळी मात्र उभे राहावे लागले.

भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरीफ यांची उपस्थिती आणि राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहणे त्यामुळे चर्चेचे ठरले.

आज दिल खुश हो गया जब देखा राष्ट्रगीत चलते पाकिस्तान पंतप्रधान खडे देखा, असा मेसेज व्हॉट्स अपवर शपथविधीनंतर फिरत होता.

पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ काल सकाळी १० वाजता नवी दिल्लीत आले आणि पाकिस्तानच्या जनतेकडून शांतीचा संदेश घेऊन दिल्लीला आलो आहे असे त्यांनी जाहीर केले. शपथविधी सोहळ्यात उपस्थितांचे विशेष लक्ष होते ते शरीफ आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याकडे. याशिवाय अफगाण राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या उपस्थितीने अफगाण-हिंदुस्थान मैत्री अधिकच दृढ होणार असल्याचे संकेत मिळाले.

शरीफ आणि राजपक्षे यांच्या उपस्थितीवरून भारतात जी नाराजीची लाट होती त्या पार्श्विभूमीवर या नेत्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली होती. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यावेळी श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्यात आले नव्हते याची आठवण त्यांनी जंतरमंतर येथे आपल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना करून दिली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 27, 2014, 12:57


comments powered by Disqus