Last Updated: Tuesday, January 8, 2013, 23:29
www.24taas.com, जम्मूपाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन पेट्रोलिंग करणा-या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तर दोन सैनिक जखमी झाले आहेत.
जम्मूच्या पूंछ भागातल्या मेंढर इथं ही घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी या दोघा भारतीय सैनिकांना ठार केल्यानंतर त्यांचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि त्यातील एकाचं डोकं घेऊन परत गेले.
एलओसी पार करून १०० मीटर आत पाकिस्तानी सैनिक घुसले होते. या हल्ल्यात दोन सैनिक जखमीही झाले आहेत. लांस नाईक सुधाकर सिंग आणि हेमराज या हल्ल्यात शहीद झाले आहेत. सरकारनं फक्त शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं सांगितलंय.
First Published: Tuesday, January 8, 2013, 20:10