Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:09
www.24taas.com,सिवनीबारावीच्या परीक्षेला बसलेल्या एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेपर कठिण गेल्याने या मुलीने घरी गेल्यानंतर फाशी लावून घेतली.
मध्य प्रदेशमधील सिवनीतील बरघाट येथील हषीर्ता बारावीची परीक्षा देत होती. तिला पेपर कठिण गेल्याने ती नाराज होती. या नाराजीतून तिने आपल्या राहत्या घरी आमहत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत तसे नमूद करण्यात आले आहे.
वार्ड क्रमांक १२ येथील नरेंद्र परते यांची हर्षीता मुलगी आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार ती बारावीचा पेपर देत होती. मात्र, तिला पेपर कठिण गेल्याने ती नाराज होती. या नाराजीतून तिने हे पाऊल उचलले असेल, असे बरघाट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तशी माहिती दिलेय.
First Published: Thursday, March 7, 2013, 15:08