Last Updated: Monday, January 28, 2013, 09:10
www.24taas.com, गोवा गोवा विधानसभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून देशातली पहिली ई-विधानसभा बनवण्याचा मान गोव्यानं मिळवलाय.
गोवा विधानसभा आता हायटेक आणि पेपरलेस झालेली असून या कामावर सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. अशा प्रकारची ही देशातील पहिली विधानसभा ठरणार आहे. या सुविधेमुळे आता गोव्यातील कामकाज पेपरलेस झालंय. त्यामुळे आमदारांकडून सर्व प्रश्न इंटरनेटद्वारे मागवण्यात येणार असून त्याची उत्तरेही इंटरनेटद्वारेच देण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कामकाज विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
गोवा विधानसभेच पाच दिवसीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार आहे. या वेळचे अधिवेशन हे १०० टक्के पेपरलेस नसेल; पण मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी खऱ्या अर्थाने पेपरलेस कामाचा अनुभव येईल.
First Published: Monday, January 28, 2013, 09:07