Last Updated: Friday, August 24, 2012, 14:05
www.24taas.com,नवी दिल्लीकोळसा खाण घोटाळ्याप्रकरकणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यानं सलग चौथ्या दिवशी संसदेत कामकाज ठप्प झालंय.
आजदेखील कामकाजाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र सरकारनं पुन्हा एकदा विरोधकांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र चर्चा नको पंतप्रधानांचा राजीनामाच हवा अशी भूमिका कायम ठेवत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सोमवारपर्यंत काम होणार नाही.
मात्र सरकारनंही ठाम भूमिका घेत झुकण्यास नकार दिलाय. त्यामुळं कोंडी कायम आहे. कॅगनं कोळसा खाण वाटपात एक लाख ८६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवालात नमूद केलंय. त्यामुळं विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालवलाय.
First Published: Friday, August 24, 2012, 14:05