संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात..., Parliament Winter Session starts from today

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आजपासून ससंदेचं हिवाळी अधिवेश सुरु होत आहे. मात्र, हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. एनडीएची काल बैठक झाली या बैठकीत तेलंगणामध्ये दोन अधिक जिल्हे जोडण्यास एनडीएन तीव्र विरोध करणार असल्याचं समजतंय. काँग्रेस महिला आरक्षण बिल आणि बढतीमध्ये आरक्षण बिल पास करण्याच्या तयारीत आहे. मात्र, समाजवादी पार्टी महिला आरक्षण बिलाला विरोध करणार आहे.

विरोधी पक्ष महागाई आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी तयारीत आहे. विरोधीपक्षानं संसदेच्या सत्रांची मर्यादा वाढवण्याचीही मागणी केलीय. संसदेचं हे सत्र केवळ १२ दिवसांचं आहे आणि भरपूर सारे मुद्दे आहेत. यामुळेच सरकारसमोर कोणती बिल पास संमत करायची, हे एक आव्हानच ठरणार आहे.

सोनाया गांधी यांच्यादृष्टीने महत्त्वाचं असलेलं महिला आरक्षण बिलही या सत्रात मांडलं जाणार आहे. पण, समाजवादी पार्टीनं या बिलाला सरळ सरळ विरोध असल्याचं जाहीर केलंय. ५ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात १२ बैठका होणार आहेत. यादरम्यान ३८ विधेयक संसदेत मांडले जातील. ८ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकालही स्पष्ट होती. त्याचा प्रभावही या अधिवेशनावर पडण्याची चिन्ह आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 11:26


comments powered by Disqus