आधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं..., passport will issue on adhar card

आधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं...

आधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं...
www.24taas.com, नवी दिल्ली

आता पासपोर्टसाठी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रं चाचपडत बसण्याची गरज नाही. कारण, केवळ आधारकार्डच्या साहाय्यानं तुम्ही आता सहज पासपोर्ट मिळवू शकणार आहात. आधार नंबरवरूनच तुमचा पत्ता आणि ओळखपत्र ग्राह्य मानून पासपोर्ट वितरीत करण्यात येणार आहेत.

याआधी पासपोर्ट काढण्यासाठी फोटो ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्रांसहित इतर १४ वेगवेगळ्या पद्धतीची कागदपत्रं गरजेची होती. मात्र, यापुञे फोटो ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र हे दोन्ही पुरावे एका आधार कार्डाच्या माध्यमातून ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळं इतर कागपत्र देण्याची आवश्यकता नाही. परराष्ट्र मंत्रालयालाही पासपोर्ट वितरीत करण्यासंबंधी आणि आधारकार्डच्या वापराविषयी आदेश जारी करण्यात आलेत.

सरकारी सबसिडीचे पैसेही आता आधारकार्डावरूनच लोकांच्या बँकेत जमा होत आहेत, आणि आता पासपोर्टही त्यामुळे आधारकार्डचा १२ अंकांचा नंबरच तुमचं नागरिक ओळखपत्र बनत चाललंय आणि ते किती महत्त्वाचं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल.

First Published: Wednesday, January 9, 2013, 13:27


comments powered by Disqus