Last Updated: Friday, August 10, 2012, 15:15
www.24taas.com, नवी दिल्लीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर जोशी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितलं, की राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या-वाईट काळात नेहमीच काँग्रेसला साथ देईल.
काही दिवसांपूर्वी मनोहर जोशी यांनी वक्तव्य केलं होतं, की शरद पवार युपीए सोडून एनडीएशी हातमिळवणी करतील. पवारांनी या वक्तव्याचा समाचार घेताना उत्तर दिलं, की जोशी यांचं हे विधान अत्यंत बेजबाबदार असून आमच्यामध्ये राजकारणाची जाण आणि सर्व नाराज पक्षांना एकत्र आणून लोकसभा निवडणूक लढण्याची क्षमता आहे.
पवार म्हणाले, “जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे. जोशींना अशा कुठल्या शक्यता वर्तवायच्या असतील, तर त्या त्यांनी आपल्याबदद्ल आणि आपला पक्ष शिवसेना यासंदर्भात वर्तवाव्यात. दुसऱ्या पक्षांमध्ये गैरसमज निर्माण होतील, अशा शक्यता त्यांनी वर्तवू नयेत. ”
First Published: Friday, August 10, 2012, 15:15