10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या!Pay Rs 10,000 crore to get interim bail: SC to Subrata Roy

10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या!

10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सहाराचे सुब्रतो राय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टाची सहमती झालीय. जामिनासाठी कोर्टानं शर्ती ठेवल्यात... 10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या अशी अट कोर्टाने ठेवलीय. पाच हजार कोटी रोख आणि पाच कोटी बँक गॅरेंटी या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आलाय

सुब्रतो राय यांना सहाराच्या गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये परत करायचे आहेत. त्यामुळं कोर्टानं ही अट ठेवलीय. सुब्रतो राय यांना उत्तर देण्यासाठी कोर्टाने उद्यापर्यंतची मुदत दिलीय. उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होईल. सहाराचे प्रमुख सुब्रतो राय 4 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहेत.

सहारा समूहानं मंगळवारी कोर्टासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. यात तीन दिवसांमध्ये 2400 कोटी रुपये नगदी जमा करण्याची तयारी दाखवली होती. तर उर्वरीत 14, 900 कोटी रुपये पाच विभागांमध्ये देणार असं सांगितलं होतं. जुलै 2015पर्यंत हे पैसे भरण्याचं सहारानं कबूल केलं होतं. मात्र यावर कोर्टानं काहीही उत्तर दिलं नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 26, 2014, 17:24


comments powered by Disqus