मोदींनी दिलं पंतप्रधानांना आव्हान, Peoples Compared the My and PM speech- Modi

मोदींनी दिलं पंतप्रधानांना आव्हान

मोदींनी दिलं पंतप्रधानांना आव्हान
www.24taas.com , झी मीडिया, अहमदाबाद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी चक्क पंतप्रधानांनाच आव्हान दिलंय. अजून जाहीर झालं नसलं तरी भाजपतर्फे पंतप्रधानपदाचे तेच उमेदवार असल्याचं बोललं जातंय. मोदी स्वत: तेच मानत असल्याचं त्यांच्या या वक्तव्यावरुन स्पष्ट होतंय. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतील तेव्हा त्यांच्या आणि माझ्या भुज इथल्या भाषणाची नक्कीच तुलना होईल, असं वक्तव्य करून मोदींनी नवी खळबळ उडवून दिलीय. भुज जिल्ह्यातील युवकांच्या मेळाव्यात बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केलं.

‘एकीकडे तुम्हाला खूप सारी आश्वासनं देणारी भाषणं ऐकायला मिळतील. दुसरीकडं उत्तम प्रकारे केलेल्या कामाचे दाखले भाषणातून ऐकायला मिळतील. एका भाषणामुळं तुम्हाला खूप निराशा येईल. तर एकामुळं तुम्हाला आशेचा किरण दिसेल,` अशी टिप्पणी मोदी यांनी पंतप्रधानांचं नाव न घेता केली.

मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय. “मोदी खोटी आकडेवारी देऊन यंदा काय माहिती देतात, याकडे बहुतेक लोकांचं लक्ष लागलं असावं”, अशी टीका कपिल सिब्बल यांनी केलीय. तर मोदींनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत उद्धटपणे केलेलं वक्तव्य असल्याची टीका संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी मोदींवर केली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 15, 2013, 08:38


comments powered by Disqus