Last Updated: Thursday, October 25, 2012, 19:05
www.24taas.com, मुंबई ऐन दिवाळी तोंडावर आली असताना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ होणार आहे. पेट्रोल प्रति लिटर ३० पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी महागणार आहे.
सरकारनं पेट्रोल पंप चालकांना कमिशन वाढवून देण्याचा निर्णय घेतल्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आलीय. पेट्रोल पंप चालकांनी काही दिवसांपूर्वी कमिशन वाढवून देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र, ही सरकारनं ही कमिशन वाढ करून सामान्यांच्या खिशाला कात्री लावलीय.
पण, नेमकी ही दरवाढ कधीपासून करण्यात येणार आहे हे मात्र अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे.
First Published: Thursday, October 25, 2012, 18:41