पेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त.. सामान्यांना अल्प दिलासा , petrol price cut 56 paise

पेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त.. सामान्यांना अल्प दिलासा

पेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त.. सामान्यांना अल्प दिलासा
www.24taas.com, नवी दिल्ली

इंधन दरवाढीच्या बोजाखाली दबलेल्या सामान्य माणसाला केंद्र सरकारने अल्पसा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात एका लिटरमागे ५६ पैशांनी कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला असून, नवे दर आज (सोमवार) मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत.

पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. प्रतिलिटर 1 रुपया 60 पैशांनी पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता होती. मात्र ५६ पैशानी पेट्रोल स्वस्त केलं गेलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत वधारल्यानं, तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. त्यामुळं पेट्रोल स्वस्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीचा आधार घेत पेट्रोलच्या किंमती वाढवणा-या तेल कंपन्या सध्या चांगलाच नफा कमावत आहेत.

First Published: Monday, October 8, 2012, 19:01


comments powered by Disqus