पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ , Petrol price hiked by 75 paise a litre, diesel by 50 paise

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आलीय. पेट्रोल ७५ पैसे तर डिझेल ५० पैसे प्रतिलिटर दराने वाढवण्यात आलय. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत.

दोन आठवड्यांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरण या कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. सततच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

सरकार पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून महागाईच्या आगीत तेल ओतत असल्याचं सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान, माकपचे नेते निलोत्पल बसू यांनी सरकारचं धोरण कॉर्पोरेट क्षेत्राला धार्जिणं असल्याची टीका केली आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 09:03


comments powered by Disqus