Last Updated: Friday, October 11, 2013, 15:58
www.24taas.com , वृत्तसंस्था, हैदराबादफायलीन चक्रीवादळाचा वेग आणखीन वाढलाय. सध्या हे चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने पुढे जात असून, हे वादळ ओडिशातील पारादीपपासून ८५० किलोमीटरवर केंद्रीत आहे. उद्या रात्री हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामानखात्यानं दिलीये.
येत्या चोवीस तासांत याची तिव्रता आणखीन वाढण्याची शक्यता हवामानखात्यानं व्यक्त केलीये. चक्री वादळामुळे ओडीशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वा-यामुळे समुद्र खवळेला असेल त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तातडीने किना-यावर परतण्याच्या सुचना देण्यात आल्यात.
तसेच सरकारने किनारपट्टी भागातील रहिवाशांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून जिल्हाधीकारी कार्यालयांमधील नियंत्रण कक्ष आणि विशेष मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 15:54