कॅडबरी चॉकलेटमध्ये निघाली पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!Pin in Cadbury

कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!

कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!
www.24taas.com, झी मीडिया, आगरताळा

सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती. याबद्दल कोर्टाने कॅडबरी कंपनीला एका महिन्यात संबंधित ग्राहकाला ३० हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

खाद्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी यासंदर्भात माहिती दिलीय. तक्राकरकर्त्याने १६ डिसेंबर २०११ रोजी आपल्या तीन वर्षांच्या मुलीसाठी कॅडबरी चॉकलेट खरेदी केलं. या कॅडबरी चॉकलेटमध्ये लोखंडी पीन आढळून आली. यासंदर्भात तक्राकरकर्त्याने ग्राहक पंचायतीकडे तक्रार केली. गेल्या आठवड्यात कोर्टाने या घटनेवर निर्णय देताना कॅडबरी इंडिया लिमिटेडला तक्रारकर्त्याला ३० हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

खटला चालवावा लागला, यासाठी तक्रारकर्त्याला एक हजार रुपये स्वतंत्ररित्या देण्याचाही आदेश कोर्टाने कॅडबरी कंपनीला दिला. ग्राहक पंचायतीच्या मदतीमुळे तक्रारकर्ता हा खटला जिंकू शकला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 19:31


comments powered by Disqus