Last Updated: Monday, November 12, 2012, 20:22
www.24taas.com, बरासातलिंग वादात अडकलेली आशियाई खेळांची सुवर्णपदक विजेती पिंकी प्रमाणिक हिला वैद्यकीय रिपोर्टच्या आधारावर पुरूष ठरविण्यात आले आहे. त्यामुळे तिच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आज कोर्टात पिंकीच्या लिंग निर्धारणासंबंधीची मेडिकल रिपोर्ट पोलिसांनी सादर केला त्यात पिंकी महिला नसून पुरूष असल्याचे सिद्ध झाले आहे. पिंकीची सध्या जामीनावर सुटका झाली आहे.
कोलकताच्या एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मंडळाने पिंकीची मेडिकल चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागला त्यांनी तो आज कोर्टात दाखल केला. पोलिसांनी पिंकीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात तिच्यावर बलात्कार, फसवणूक आणि धमकी देण्याचा आरोप लावण्यात आहे.
पिंकी ही महिला नसून पुरूष असल्याचा तसेच बलात्कार केल्याचा आरोप पिंकीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या अनामिका आचार्य यांनी लावला होता. त्यावरून पिंकीला १४ जून रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या लिंग निर्धारणासाठी एका वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
पिंकीने २००६च्या दोहा आशिया खेळांमध्ये महिल्यांच्या ४x ४०० रिले रेसमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
First Published: Monday, November 12, 2012, 20:22