देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी, Pleased God to the child narabali

देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी

देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी
www.24taas.com, झी मीडिया, गुहाहटी

मांत्रिकाच्या सहाय्याने देवाला खूष करण्यासाठी एक मन सुन्न करणारी घटना आसाम राज्यात घडलेय. सहा महिन्यांच्या आपल्या बाळाचा नरबळी दिला गेलाय. या घटनेने परिसरात हादरा बसलाय. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेय.

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील सोनारी शहरात देवाला खूष करण्यासाठी चक्क बालकाला जिवंत जाळण्यात आलं आहे. बाळाचा नरबळी देणारे हे कुटुंब मूळचे बिहार राज्यातील आहे.

काही वर्षांपासून बिहारमधील या कुटुंबीयांचे सोनारीमध्ये वास्तव्य आहे. बिहारी जोडप्याला चार मुले आहेत. त्यापैकी लहान असलेल्या बाळाला जिवंत जाळले. देवाला खूष करण्यासाठी आपण बाळाचा नरबळी दिल्याची कबुली क्रुर दाम्पत्याने दिली. पोलीस मांत्रिकाचा शोध घेत असून जोडप्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

एक मांत्रिक गेल्या तीन दिवसापासून या दाम्पत्याकडे येत होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले. आपले लहान बाळ हरविल्याचे या दाम्पत्याने सांगताच शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर त्यांची अधिक माहिती काढण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांनी देवाला खूष करण्यासाठी बाळाला जिवंत जाळले असून, काल रात्री देवपूजा केलेल्या ठिकाणी पुरल्याचे सांगितले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 13:50


comments powered by Disqus