पंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!, PM to talk with Rahul Gandhi

पंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!

पंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अमेरिकेच्या दौ-यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मी राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत त्यामुळे मी विचलित होत नाही, असं पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे असं आवाहनही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विधान अपेक्षितच होते अशी उपहासात्मक टीका भाजपानं केलीय. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा वटहुकूम तातडीने मागे घ्यावा अशी मागणी जनता दल युनायटेडनं केलीय.

ज्या वटहुकूमाच्या मुद्यावर पंतप्रधान राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत तो वटहुकूम फाडून टाकला पाहिजे असं आक्रमक मत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 23:11


comments powered by Disqus