पंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं, PM unlikely to attend Nawaz Sharif’s swearing-in ceremony

पंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं

पंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं
www.24taas.com, नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे नवाझ शरीफ यांच्या शपथ समारंभात सहभागी होणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांचं आमंत्रण धुडकावून लावलंय.

भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या शपथ सोहळ्यात सहभागी झाले तर आपल्याला आनंदच होईल, असं नवाझ शरीफ यांनी सोमवारी म्हटलं होतं. एका भारतीय चॅनलशी बोलताना शरीफ यांनी, ‘आपल्याला १९९९ पासून आपल्या यात्रेला प्रारंभ करावा लागेल. भारत मला आमंत्रण देऊ अगर नाही पण मी मात्र तिथं नक्की जाणार’ असं म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळातच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शरीफ यांना निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या तसंच त्यांना भारतात येण्याचं आमंत्रणही दिलं होतं.


भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दल शरीफ यांच्या प्रतिबद्धतेबद्दल भारतीय जनता तुमचं स्वागतंच करेल, असं मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटलं होतं. परतू, शरीफ यांचं पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वीकारलेलं नाही. अर्थातच, पाकिस्तानात होणाऱ्या शरीफ यांच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी ते जाणार नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, May 14, 2013, 11:52


comments powered by Disqus