PMO ट्विटर खाते झाले डिलीट, भाजपने ठरवले अनैतिक, PMO`s official Twitter handle re-named; BJP calls i

PMO ट्विटर खाते झाले डिलीट, भाजपने ठरवले अनैतिक

PMO ट्विटर खाते झाले डिलीट, भाजपने ठरवले अनैतिक

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नरेंद्र मोदींची निवड पंतप्रधान म्हणून झाल्यानंतर पहिला वाद हा ट्विटर अकाउंटवरून निर्माण झाला आहे. PMOIndia नावाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह याचे कार्यालय या ट्विटर खात्याचा वापर करीत होते. त्याला चक्क डिलीट करण्यात आले आहे.

हे खाते डिलीट झाल्यानंतर एका कैसर अली नावाच्या व्यक्तीने या खात्याला आपल्या नावावर रजिस्टर केले आहे. ज्या वेळी ट्विटर कंपनीचे लक्ष्य यावर पडले तेव्हा त्यांनी खाते ताब्यात घेतले आणि त्याला आर्काइव्हीमध्ये टाकले. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून नवीन खाते जेव्हा तयार होईल तेव्हा जुने खाते @PMOIndiaArchive वर उपलब्ध असणार आहे.

ट्विटर खाते डिलीट करण्याची काय गरज होती असा प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात येत आहे. PMO ट्विटर खाते कोणा एका व्यक्तीचे नसून ते कार्यालयाचे आहे. त्या खात्यावर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसतो. असे असताना कोणी आणि का या खात्याला डिलीट केले, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

या खात्याला १२ लाखांपेक्षा अधिक जण फोलो करत होते. आता या खात्याला PMOindia Archive मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. आता नरेंद्र मोदींच्या कार्यालयासाठी नवीन ट्विटर अकाउंट बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 20:24


comments powered by Disqus