Last Updated: Tuesday, August 27, 2013, 21:35
www.24taas.com, झी मीडिया, अलाहबादउत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीला भर चौकात जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यातून तरुणी बचावली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अलाहाबादमधील कर्नकगंज येथे एक तरुणी रस्त्यावरुन चालत जात होती. या दरम्यान एक तरुणाने तिच्यावर हल्ला केला. तिच्यावर अंगावर पेट्रोल फेकून तिला जाळण्याचा त्याने प्रयत्न केला.
मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तरुणी यातून बचावली. छेडछाडीला विरोध दर्शवल्याने एका रोडरोमीओने हे कृत्य केले असावे अशी शक्यता आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 27, 2013, 21:35