अनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत, possible 12 Gas cylinders- Petroleum Minister

अनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत

अनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

निवणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं अनुदानित सिलिंडरची संख्या वाढवण्याचा विचार सुरू केलाय. ही संख्या नऊ वरून १२ पर्यंत वाढवण्याचे संकेत पेट्रोलिअम मंत्री वीरप्पा मोईलींनी दिले आहेत. याबाबत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलीय. याबरोबरच कॅश ट्रान्सफर योजनाही थांबवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची संख्या वर्षाला ९वरून १२ करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पेट्रोलिअम मंत्री वीरप्पा मोईली यांनीही संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी तसा निर्णय होण्याची शक्यता आहे.

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असे चिदम्बरम यांनी आधीच स्पष्ट केलेय. विनाअनुदानित सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याबाबतही विचार सुरू असल्याचे संकेत आहे. मात्र, २२० रूपयांनी अनुदानित सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आलेय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014, 21:27


comments powered by Disqus