Last Updated: Thursday, December 27, 2012, 12:05
www.24taas.com, नवी दिल्लीपोस्टाच्या कुरिअरचा वापर थेट अंमली पदार्थाच्या पार्सलसाठी करण्यात आला. त्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पोस्टाच्या कुरिअर माध्यमातून परदेशात अंमली पदार्थ पाठविण्यासाठी वापर केला गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.
देशाच्या राजधानी दिल्लीत एका पोस्ट कार्यालयाच्या कुरिअरचा वापर अंमली पदार्थ पाठविण्यासाठी वापर केला गेला. एका पोस्ट कार्यालयाच्या कुरिअरमधून अंमली पदार्थांची पार्सल जप्त केल्याचे माहिती पीटीआयने दिली आहे.
अंमली पदार्थ प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी दिल्लीतील एका पोस्ट कार्यालयाच्या कुरिअर पार्सल विभागातून काही पार्सल जप्त केली आहेत. ही मादक पदार्थ पार्सल परदेशात कुरिअर करण्यात आली होती. मात्र, पाठविण्यात आलेली पार्सल चुकीच्या पत्त्यामुळे ती पुन्हा परदेशातून भारतात परत आलीत, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
परदेशात पाठविण्यात आलेल्या अंमली पार्सल जवळपास दोन किलो ग्रॅम वजनाचे होते. अंमली पदार्थाचे कुरिअर हे इस्टोनिया, कॅनडा, रशिया आणि श्रीलंका या देशात पाठविण्यात आली होती. मात्र, या देशातील दिलेल्या पत्त्यांवर कुरिअर पोहोविण्यात आले. मात्र, त्याठिकाणचे पत्ते चुकीचे असल्याने ही पार्सल पुन्हा माघारी आलीत.
First Published: Thursday, December 27, 2012, 12:05