Last Updated: Thursday, July 18, 2013, 10:47
www.24taas.com, झी मीडिया, तिरुअनंतपुरम केरळास्थित कॅलिकट युनिव्हर्सिटीनं विद्यार्थिनींसाठी सुखकारक निर्णय घेतलाय. गर्भवती विद्यार्थिनींना युनिव्हर्सिटी ‘मॅटर्निटी लिव्ह’ देणार आहे. विशेष म्हणजे या नव्या निर्णयामुळे गर्भवती विद्यार्थिनींचं वर्षही वाया जाणार नाही.
आपलं उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थिनींनी आत्तापर्यंत गर्भधारणेच्या कारणामुळे आपलं शिक्षण मध्येच सोडावं लागलं किंवा बाळाच्या जन्मामुळे काही महिन्यांचा किंवा वर्षांचा कालावधी राहिल्यामुळे पुन्हा एकदा पहिल्यापासून आपलं शिक्षण सुरू करावं लागलं. या पार्श्वभूमीवर कॅलिकट युनिव्हर्सिटीचा हा निर्णय महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे.
गर्भवती विद्यार्थिनींनी ज्या सेमिस्टरमध्ये आपलं शिक्षण अर्धवट सोडलं असेल त्याच सेमिस्टरपासून त्यांना पुन्हा शिक्षण घेता येईल. युनिव्हर्सिटीच्या सिनेटनं हा निर्णय घेतलाय. गर्भवती विद्यार्थिनींना गरोदरपणानंतर आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील.
अशा प्रकारचा निर्णय घेणारी कॅलिकट युनिव्हर्सिटी भारतातली पहिली युनिव्हर्सिटी आहे. एमसीए अभ्यासक्रमासाठी सुरूवातीला या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यानंतर इतर अभ्यासक्रमांत शिक्षण घेणाऱ्या गर्भवती विद्यार्थिनींसाठी हा निर्णय लागू केला जाणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, July 18, 2013, 10:31