Last Updated: Wednesday, March 5, 2014, 18:57
www.24taas.com, झी मीडियाएका विवाहित महिलेचं पतीने केलेलं लैंगिक शोषण हे एका प्रकारे बलात्कारासारखंच असल्याचं दिल्लीतील न्यायालयाने म्हटलं आहे.
या प्रकरणावरून कोर्टाने संबंधित महिलेच्या पतीला जामीन देण्यास नकार दिला आहे. आरोपी पतीवर प्रेग्नंट पत्नीसोबत जबरदस्तीने सेक्स केल्याचा आरोप आहे.
तसेच न्यायालयाने आरोपीविरोधात अनैसर्गिक सेक्सशी संबंधित असलेल्या 377 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश आले आहेत.
आरोपीची मानसिकता जास्तच खराब असल्याचं सांगून न्यायालयानं आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे.
आरोपींच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलावरही वाईट परिणाम झाला आहे. दि्ल्ली सरकारने या महिलेची जबाबदारी घ्यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 5, 2014, 17:22