मोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!President `adjusts` Bihar trip dates for Modi

मोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!

मोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!
www.24taas.com , झी मीडिया, पाटणा

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा आवरता घेतलाय. राष्ट्रपतींनी आपला पाटण्याचा दौरा एका दिवसानं कमी करून राजधानीत एकदिवस आधी परतण्याचं मान्य केलंय.

भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दोघंही २७ ऑक्टोबर यादिवशी पाटण्यात येणार होते. राष्ट्रपतींच्या पाटणा भेटीच्या दिवशीच भाजपची ‘हुंकार रॅली’ होती. भाजप नेते शाहनवाझ हुसैन आणि राजीवप्रताप रूडी यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन २७ तारखेचा राष्ट्रपतींचा पाटण्यातला कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली. राष्ट्रपतींनीही ही मागणी मान्य करत २६ तारखेलाच नवी दिल्लीत परतणार असल्याचं स्पष्ट केलं.

२७ तारखेला राष्ट्रपती पाटणा आयआयटीतच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रपतींचा दौरा भाजपच्या ‘हुंकार रॅली’च्या दिवशीच आखल्याची टीका भाजप नेते सुशील मोदी यांनी केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 15:27


comments powered by Disqus